
Friday, 19 February 2021
मोफत आरोग्य सुविधेचा उपक्रम.
प्रतिनिधी: अजय जळगांवकर
पालघर प्रतिनिधी: हेल्पज इंडिया आणि इंनर व्हील क्लब पालघर यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली ज्येष्ठ नागरिकांना चालत -फिरता दवाखाना यांद्वारे मोफत आरोग्य सेवा सुविधेचा उपकरणे राबविण्यात येत असून नुकतीच, पालघर जिल्ह्यामध्ये यांची सुरुवात करण्यात आली.

जेष्ठ नागरिकांना या फिरत्या- चालता दवाखान्या मद्ये जेष्ठ नागरिकांची मोफ़त आरोग्य तपासणी व औषधोपचार,
त्याचप्रकारे तज्ञ ,एमबीबीएस डॉक्टराद्वारे करण्यात आले. या सेवेचा लाभ येथील पिरपाडा, सफाले, केळवे, पालघर मधील मोह पाडा लोकमान्य पाडा, विरेद्र नगर, गधा पाडा,विष्णुनगर, सीता पाडा, या ठिकाणच्या एकूण ५६० जेष्ठ नागरिकांनी घेतला आहे.
अशा प्रकारे दर पंधरा दिवसांनी सकाळी ९.१५ ते सायं ५.१५ या वेळेत ही सुविधा नियोजित करण्यात स्थळी उपलब्ध होणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांना विनंती आहे की या मोफत चालता- फिरता वैद्यकीय सेवेचा लाभ घेण्यात यावे असे आवाहन हेल्पेज इंडिया या सामाजिक संस्थेचे व्यवस्थापक श्री चंद्रकांत ढोले यांचेसह, इंनर व्हील क्लबच्या अध्यक्षा माधवी उलखंडे,तसेच आनंद वृद्धाश्रमच्या अध्यक्षा सौ मनीषा कोटक यांनीही आवाहन केले आहे.नुकत्याच राबविण्यात आलेल्या उपक्रमासमाजी आरोग्य सभापती मा. सौ. लक्ष्मी हजारे व नगरसेविका मोना मिश्रा यांनी भेट देऊन आरोग्य शिबीराची शोभा वाढवली
Inspiring story there. What happened after?
Take care!