
वसई-विरार शहर महानगरपालिका
मुख्य कार्यालय विरार

दि.१९/०८/२०२१
प्रेसनोट
मा.ना.श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते आज दि.१९ ऑगस्ट, २०२१ रोजी दुपारी १२.३० वाजता वसई विरार शहर महानगरपालिकेच्या १) माता व बाल रुग्णालय बोळींज, व २) सोपारा जनरल हॉस्पिटल, नालासोपारा (प.), या नवीन रुग्णालयांचा लोकार्पण सोहळा तसेच १) आचोळे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल इमारत व २) बोळींज येथील म्हाडा कॉलनी ते श्रीप्रस्थ शनीमंदीर पर्यंत डी.पी. रस्ता विकसित करणे कामाचा भूमिपूजन सोहळा ऑनलाईन प्रणालीद्वारे संपन्न झाला.
सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.ना.श्री.अजितदादा पवार, मा.उपमुख्यमंत्री तसेच मा.ना.श्री.बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री, मा.ना.श्री.एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री,
मा.ना.श्री.दादाजी भुसे, पालकमंत्री पालघर जिल्हा, मा.ना.श्री.दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री, मा.ना.श्री.अब्दुल सत्तार, राज्यमंत्री, महसूल ग्रामविकास तसेच इतर माननीय मंत्री महोदय, मा.खासदार, मा.आमदार, मा.मुख्य सचिव तसेच इतर वरिष्ठ अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

मुख्य कार्यालय विरार
वसई विरार शहर महानगरपालिका