वसई-विरार शहर महानगरपालिका
मालमत्ता कर विभाग
दि.१४/०९/२०२१
प्रेसनोट

वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे नागरिकांच्या सुविधेसाठी तसेच महानगरपालिकेच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टीने “विशेष मालमत्ता कर आकारणी शिबीर” राबविण्यात येत आहे. नवीन मालमत्ता कर आकारणी, वाढीव मालमत्ता कर आकारणी, तसेच मालमत्तेच्या वापरात बदल झाल्याबाबत सुधारीत कर आकारणी करणे बाबतचे सर्व अर्ज आवश्यक कागदपत्रांसह नागरिकांना महानगरपालिकेच्या प्रभाग समिती कार्यालयात दर महिन्याच्या ०१ ते १० तारखेला सकाळी १०.०० ते दुपारी ०२.०० या वेळेत सादर करता येतील. नागरिकांकडून प्राप्त झालेल्या अर्जांवर संबंधित कर्मचाऱ्यांकडून त्याच दिवशी नियमानुसार कार्यवाही करून तात्काळ कर आकारणी करण्यात येणार आहे. विशेष कर आकारणी शिबिरात अर्ज सादर केलेल्या दिवशीच तात्काळ कर आकारणी करण्यात येणार असल्यामुळे नागरिकांच्या व महानगरपालिकेच्या वेळेची बचत होणार असून महानगरपालिकेच्या उत्पन्न वाढीस मदत होणार आहे.
वरील नमूद प्रकरणांबाबत तसेच एखाद्या मालमत्तेला कर आकारणी न झाल्याबाबत कोणाचीही तक्रार असल्यास दर आठवड्याच्या मंगळवारी दुपारी ०२.०० नंतर मा.आयुक्त साहेबांकडे तक्रारदारास तक्रार सादर करता येईल.
“विशेष मालमत्ता कर आकारणी शिबीर” सप्टेंबर, २०२१ या महिन्यात २० ते ३० तारखेला राबविण्यात येणार असून यापुढे म्हणजेच ऑक्टोबर, २०२१ पासून दर महिन्याच्या ०१ ते १० तारखेला राबविण्यात येईल. तरी सर्व नागरिकांनी सदर शिबिराला जास्तीत जास्त प्रतिसाद देऊन महानगरपालिकेला सहकार्य करावे.
मालमत्ता कर विभाग
वसई विरार शहर महानगरपालिका