
वसई-विरार शहर महानगरपालिका
घनकचरा व्यवस्थापन विभाग
दि.११/११/२०२१
प्रेसनोट
शहरातील जनतेला कळविण्यात येते की, केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने अधिसूचना क्र.जीएसआर-३२०(इ) दिनांक १८/०६/२०१६ अन्वये प्लॅस्टिक वेस्ट मॅनेजमेंट रुल्स २०१६ लागू केलेले आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाने अधिसूचना क्रमांक प्लॅस्टिक – २०१८ /प्र.क्र.२४/ तां.क्र.४ तसेच दिनांक २३ मार्च २०१८ च्या अधिसूचना व दिनांक ११ एप्रिल २०१८ च्या अधिसुचनेन्वये सुधारणा, दि.०२ जुलै २०१८ नुसार अविघटनशील कचऱ्यामुळे स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या अंमलबजावणीवर अनिष्ट परिणाम होत असल्याने ‘महाराष्ट्र प्लॅस्टिक व थर्मोकॉल अविघटनशील वस्तूंचे’ (उत्पादन, वापर विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक व तदनंतर वेळोवेळी केलेल्या सुधारणा) अधिसूचना, २०१८ संपूर्ण राज्यासाठी लागू करण्यात आली आहे.
“Maharashtra Plastic and Thermocol Products (Manufacture, Usage Sale, Transport, Handling and Storage)” Notification 2018.
सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, दि.१२ ऑगस्ट, २०२१ रोजीचे पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन, मंत्रालय यांच्या नियम व अधिसूचनेनुसार <आली आहे. तसेच, <75 Microns पेक्षा कमी असलेल्या पिशव्यांचा वापर करताना आढळल्यास खालील तपशील प्रमाणे उचित कारवाई व दंड आकारण्यात येईल याची नोंद घ्यावी.
तपशील आकारण्यात येणारा दंड
प्लॅस्टिक (<75 Microns) व थर्मोकॉल अविघटनशील वस्तूंचे (उत्पादन, वापर विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक) रु.५,०००/- प्रथम वेळेस.
रु.१०,०००/- द्वितीय वेळेस. त्यानंतर
रु.२५,०००/- तृतीय वेळेस व तीन महिन्यांकरिता कारावास.
घनकचरा व्यवस्थापन विभाग वसई विरार शहर महानगरपालिका