
मुंबई, ठाणे आणि कर्नाटकातील खंडणीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये हवा असलेला गँगस्टर सुरेश पुजारी याला काल रात्री फिलीपिन्समध्ये अटक करण्यात आली असून त्याला काल रात्री भारतात आणण्यात आले. याशिवाय तो लोकांना धमकीचे फोनही करत असे. फिलिपाइन्समध्ये त्याच्या अटकेनंतर अनेक व्यापारी, हॉटेलवाले, दारू विक्रेते आणि केबल ऑपरेटर्सनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
गँगस्टर सुरेश पुजारीला दिल्लीत आणण्यात आले असून सीबीआयच्या तपासानंतर सुरेश पुजारीला ताब्यात घेण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेचे पथक आले होते.
ठाणे आणि मुंबई पोलिसांनी सुरेश पुजारी विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती, त्या आधारे त्याला फिलिपाइन्समधून शोधून भारतात आणण्यात आले होते. सुरेश पुजारीवर मुंबईत २५ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सुरेश पुजारी हा गुंड रवी पुजारी सोबत काम करायचा जो नंतर वेगळा झाला आणि त्याने स्वतःची टोळी तयार केली आणि वेगळे काम सुरु केले तो सध्या फिलीपिन्समध्ये लपला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुजारी आपल्या मैत्रिणीसोबत फिलीपाईन्सच्या एका हाय प्रोफाईल भागात राहत होता आणि तो क्वचितच घरातून बाहेर पडत असे.